‘कॅफे कॉफी डे’ चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृत्यू झाल्याचे उघड झाल्यानंतर कॉफी डे एंटरप्रायजेसच्या संचालक मंडळाने एस. व्ही. रंगनाथ यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. संचालक मंडळाची पुढील बैठक ८ ऑगस्ट रोजी होणार आहे.

कॅफे कॉफी डेचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह नेत्रावती नदीमध्ये सापडला आहे. ते सोमवारपासून बेपत्ता होते. व्ही. जी. सिद्धार्थ हे कॅफे कॉफी डेचे संस्थापक, मालक आणि भाजपा नेते एस. एम. कृष्णा यांचे जावई होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील २४ तासांपासून कॅफे कॉफी डेचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ बेपत्ता होते. बंगळुरुहून साकलेशपूरला जात असताना ते नेत्रावती नदीच्या पुलावर उतरले. त्यानंतर त्यांनी कार घेऊन ड्रायव्हरला पुढे जाऊन थांब असे सांगितले. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. त्यांचं झालं काय हा प्रश्न कायम होता. अखेर त्यांचा मृतदेह हाती लागला आहे. सोमवार संध्याकाळपासून ते बेपत्ता झाले होते.