राज्यसभेत दीर्घकाळ गैरहजर राहिल्याबाबत वादाच्या भोवऱयात सापडलेल्या खासदार सचिन तेंडुलकरला आता अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठीही आणखी रजा मंजूर करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून खासदार सचिन आणि रेखा यांच्या राज्यसभेतील दीर्घकाळ अनुपस्थितीचा विषय चांगलाच तापलेला आहे. सचिन अर्थसंकल्पीय अधिवेशनातही गैरहजर राहिला होता. यामुळे सचिनला दिलेली खासदारकी काढून घ्यावी अशी मागणी राज्यसभा सदस्यांनी लावून धरली आहे.
त्यात सचिनने कौंटुंबिक कारण देत उर्वरित अधिवेशनालाही गैरहजर राहण्याची परवानगी मागितली. सचिनची मागणी राज्यसभा उपाध्यक्ष पी.जे.कुरीयन यांनी मंजूर केली आहे. यावर राज्यसभा सदस्यांनी जोरदार आक्षेप नोंदविला. खासदार नरेश अग्रवाल यांनी सचिन संसद भवनाच्या बाजूलाच असलेल्या विज्ञान भवनातील कार्यक्रमाला हजर राहू शकतात पण, संसदेच्या अधिवेशनाला ते हजर राहू शकत नाहीत अशी टीका केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Aug 2014 रोजी प्रकाशित
खासदार सचिन तेंडुलकरला आणखी ‘रजा’ मंजूर!
राज्यसभेत दीर्घकाळ गैरहजर राहिल्याबाबत वादाच्या भोवऱयात सापडलेल्या खासदार सचिन तेंडुलकरला आता अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठीही रजा मंजूर करण्यात आली आहे.
First published on: 11-08-2014 at 04:30 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar under attack in rs for prolonged absence granted leave