२० हजार कोटींच्या ठेवींची रक्कम गुंतवणूकदारांना परत न दिल्याप्रकरणी सहारा समूहाचे सर्वेसर्वा यांना अटक करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिल्यानंतर आपल्याविरोधातील अजामीनपत्र अटक वॉरण्ट रद्द करण्याच्या मागणीसाठी रॉय यांनी गुरुवारी न्यायालयात धाव घेतली.
सदर रकमेचा भरणा न केल्याप्रकरणी रॉय यांना न्यायालयात उपस्थित राहण्याची सूचना करूनही ते अनुपस्थित राहिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने त्यांना येत्या ४ मार्चपर्यंत अटक करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयात हजर न राहिल्याबद्दल रॉय यांनी न्यायालयाची विनशर्त माफीही मागितली आहे. आपली ९२ वर्षांची आई अत्यंत आजारी असून तिच्या देखरेखीसाठी न्यायालयात हजर न राहण्यासंबंधी रॉय यांनी दाखल केलेली याचिका खंडपीठाचे न्या. के. एस. राधाकृष्णन् आणि न्या. जे. एस. केहार यांनी फेटाळून लावली होती.
दोनच दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशास वाटाण्याच्या अक्षदा लावणाऱ्या सुब्रतो रॉय यांनी अचानक ‘घूमजाव’ करून गुरुवारी न्यायालयाकडे अटक वॉरण्ट रद्द करण्यासाठी त्याच न्यायालयात धाव घेतल्यामुळ आर्थिक वर्तुळात चर्चा व्यक्त केली जात होती.