सून अपर्णा यादव यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे मेहुणे आणि माजी सपा नेते प्रमोद गुप्ता यांनी आज लखनऊमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुप्ता यांनी आज औरैया येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, “आज दुपारी मी लक्ष्मीकांत बाजपेयी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.” त्यांनी पुढे आरोप केला, “सपा माफिया आणि गुन्हेगारांना आश्रय देत आहे आणि अशा पक्षात राहण्यात अर्थ नाही. अखिलेश यांनी मुलायमसिंह यादव यांना तुरुंगात टाकले आहे. नेताजी (मुलायम सिंह) आणि शिवपाल यांचा अखिलेश यांनी छळ केला होता.”

अपर्णा यादव यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. अपर्णा या मुलायम सिंह यादव यांचा धाकटा मुलगा प्रतीक याच्या पत्नी आहेत. २०११ मध्ये त्यांचे लग्न झाले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी, अपर्णाने लखनौ कॅंट विधानसभा मतदारसंघातून तिकीट मागितले आहे.

अपर्णाने २०१७ च्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत लखनऊ कँट मतदारसंघातून निवडणूक लढवून राजकीय पदार्पण केले. मात्र, भाजपाच्या रिटा बहुगुणा जोशी यांनी जवळपास ६३,००० मते मिळवून त्यांचा पराभव केला. राजकारणासोबतच अपर्णा महिलांच्या कल्याणासाठी एक संस्था चालवते. ती लखनऊमध्ये गायींसाठी निवाराही चालवते. यापूर्वीही, तिने राज्यातील भाजपाच्या उपक्रमांचे कौतुक केले आहे आणि अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी ११ लाख रुपयांची देणगी देखील दिली होती.
.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samajwadi party supremo mulayam singh yadavs brother in law joins bjp vsk
First published on: 20-01-2022 at 18:49 IST