दीपक संधू यांनी देशाच्या मुख्य माहिती आयुक्त म्हणून शपथ घेतली. गेली चार वर्षे त्या माहिती आयुक्त होत्या. मुख्य माहिती आयुक्तपदी विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.संधू या १९७१ च्या भारतीय माहिती सेवेच्या तुकडीतील अधिकारी आहेत. प्रेस इन्फर्मेशन ब्युरो, दूरदर्शन, आकाशवाणीत महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले. कान, बर्लिन, व्हेनिस, टोकियो येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी संधू यांना शपथ दिली. प्रलंबित असलेल्या खटल्यांचा निपटारा करण्यास प्राधान्य देणार असल्याचे संधू यांनी सांगितले. अर्थात ६४ वर्षीय संधू यांना केवळ तीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.