School Building Collapses in Rajasthan: राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात सरकारी प्राथमिक शाळेचे छप्पर कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यात सात मुलांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. तर १५ विद्यार्थी गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे.

डांगीपुरा पोलीस ठाण्याचे प्रमुख विजेंद्र सिंह यांनी सांगितले की, ज्याठिकाणी शाळेचे छप्पर कोसळले तिथे जवळपास ३० ते ४० मुले उपस्थित होते. या दुर्घटनेत चार मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तर आठ विद्यार्थी गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे.

या शाळेत २७ विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती मिळत आहे. दुर्घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या दुर्घटनेनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी शोक व्यक्त केला आहे. झालावाड येथील पिपलोडी शाळेची इमारत कोसळून झालेली दुर्घटना दुःखद असल्याचे ते म्हणाले. जखमी विद्यार्थ्यांना उपचार सुविधा देण्याबाबत संबंधित यंत्रणेला आदेश देण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही या दुर्घटनेनंतर दुःख व्यक्त केले.