एक्स्प्रेस वृत्तसेवा
उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधील ज्या शाळेत शिक्षिकेने इतर मुलांकरवी एका मुस्लीम विद्यार्थ्यांला मारहाण केल्याचा प्रकार घडला होता, ती शाळा बंद करण्यात आली आहे.या विद्यार्थ्यांबाबत जातीय शेरेबाजी केल्याचा आणि इतर विद्यार्थ्यांना त्याला मारहाण करण्यास सांगितल्याचा आरोप असलेली तृप्ता त्यागी या शिक्षिकेच्या मालकीची मुझफ्फरनगरमधील ही खासगी शाळा सध्या बंद करण्यात आली आहे, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी शुभम शुक्ला यांनी रविवारी सांगितले.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
नेहा पब्लिक स्कूलने शिक्षण खात्याच्या निकषांची पूर्तता केली नसल्याने मान्यता रद्द करण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. शाळेतील सर्व ५० विद्यार्थ्यांना एका आठवडय़ात सरकारी शाळेत किंवा इतर शाळांमध्ये सामावून घेतले जाईल.