विद्यार्थ्यांला स्वमूत्र प्राशनाची शिक्षा देणाऱ्या सत्यभामा इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेची मान्यता काढून घेण्यात यावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. पूर्व गोदावरी जिल्ह्य़ाचे शिक्षणाधिकारी श्रीनिवासुलू रेड्डी यांनी ही शिफारस केली आहे. छोटय़ा शिशू वर्गात (लोअर केजी) शिकणाऱ्या एका मुलाने स्वत:जवळील बाटलीत लघवी केली. या गुन्ह्य़ाची शिक्षा म्हणून स्वमूत्र प्राशन करण्यास त्या मुलाला शिक्षिकेने भाग पाडले. मुलाने या घटनेची माहिती आपल्या पालकांना दिली. या कृत्याने संतापलेल्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.या प्रकरणाची चौकशी शिक्षणाधिकारी रेड्डी करीत होते. सत्यभामा इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारस जिल्हाधिकारी नीतू कुमारी प्रसाद यांच्याकडे रेड्डी यांनी केली. या घटनेमुळे देशात खळबळ उडाली होती. केंद्र सरकारनेही या प्रकरणाची दखल घेतली होती.