गुरु ग्रहावर जीवाणू पाठवून वातावरणाचा अभ्याससौरमालेची माहिती मिळण्यास उपयुक्त

गुरू ग्रहावर असलेल्या ढगांमध्ये विविध संवेदक असलेले जीवाणू पाठवून माहिती मिळवण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करणार आहेत.

गुरू ग्रहावर असलेल्या ढगांमध्ये विविध संवेदक असलेले जीवाणू पाठवून माहिती मिळवण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करणार आहेत. हे जीवाणू तेथील वातावरणात सोडल्यानंतर जळून जातील त्यापूर्वीच ही माहिती गोळा करावी लागेल.
 ग्रह वैज्ञानिकांनी अवकाश विज्ञान व अभियांत्रिकी या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात म्हटले आहे की, गुरू ग्रहावर शोधयाने पाठवली जाणार असून ती १५ मिनिटे टिकतील व त्या काळात ते १५ मिनिटांच्या कार्यशील स्थितीत २० मेगाबाईट माहिती पाठवतील अशी अपेक्षा आहे त्यामुळे तेथील वातावरणाचे चित्र उभे करण्यास वैज्ञानिकांना मदत होईल.
 गुरू ग्रहाभोवती फिरणारी याने यापूर्वी पाठवली गेली होती.
त्यात तेथील बाह्य़पृष्ठभागांचे चित्रण करण्यात व त्या ग्रहाचे नैसर्गिक चंद्र शोधण्यात यश आले होते. मात्र गुरूच्या वातावरणात शिरून संशोधन करण्याची स्थिती आली नव्हती पण आता तेथील दाट ढगांमध्ये शिरून अर्थपूर्ण माहिती मिळवता येईल.
 सुमारे ३०० किलो वजनाचे यान तेथील वातावरणात जाईल व त्यात ते काही माहिती पृथ्वीकडे पाठवू शकेल. इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून कॅमेरे व उपकरणे यांच्या लहान आवृत्त्या तयार केल्या जातील. हे यान गुरूच्या वातावरणात गेल्यानंतर पॅराशूटशिवाय खाली येईल असे टोरांटो येथील पृथ्वी व अवकाश विज्ञान विद्यापीठाच्या संशोधन केंद्राचे जॉन मूर यांनी सांगितले. छोटे यान वापरून ते पॅराशूटच्या मदतीने हळूहळू खाली आणले तर जास्त माहिती मिळवता येऊ शकते कारण त्यात जास्त वेळ मिळेल असेही मूर यांनी म्हटले आहे.
एक किलोग्रॅमपेक्षा कमी वजन असलेले उपग्रह अतिसूक्ष्म, नॅनो, घनाकृती या स्वरूपात पृथ्वीच्या कक्षातही वापरले जातात. या उपग्रहांना किती सौरऊर्जा साठवता येईल याचा अंदाज प्लुटोनियमची ऊर्जा असलेले थर्मोइलेक्ट्रिक जनरेटर वापरून घेतला जाईल. अतिसूक्ष्म उपग्रह माहिती मिळवण्याकरिता उपयोगी यंत्रणा धारण करू शकतील. युरोपीय अवकाश संस्थेच्या मदतीने २०३० मध्ये ज्यूस ऑरबायटर पाठवले जाणार असून त्यासोबत हे सूक्ष्म उपग्रह गुरूच्या वातावरणात जातील. स्मारा योजनेच्या माध्यमातून वातावरण अभ्यास व इतर बाबी शक्य होतील.
सौरमालेत सूर्यवगळता दोन तृतीयांश वस्तुमान गुरूमध्ये सामावलेले असल्याने या ग्रहाचा अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे. गुरूवर लघुग्रह सतत आदळत असतात त्यामुळे तेथील वातावरणाच्या अभ्यासाने नवीन माहिती मिळू शकते. सौरमालेची रचना समजण्यास उपयुक्त ठरणारी माहिती त्यातून मिळू शकेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Scientists consider sending microprobes to study atmosphere of jupiter

ताज्या बातम्या