एअर फोर्स प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी पूर्व लडाख सीमेवरील स्थिती संदर्भात एक महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. चीनच्या कुरापतखोर स्वभावामुळे मागच्या काही महिन्यांपासून या भागात मोठया प्रमाणावर तणाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“उत्तर सीमेवरील सध्याची सुरक्षा स्थिती अस्वस्थ करणारी आहे. युद्धाची स्थिती नाही, पण शांतताही नाही तुम्हाला कल्पना असेलच, आपली सुरक्षा दले कुठल्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत” असे एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया म्हणाले.

ब्रह्मोस, निर्भय, आकाश क्रूझ क्षेपणास्त्र सीमेवर सज्ज, ड्रॅगनला त्याच भाषेत देणार प्रत्युत्तर

“लडाख सीमेवरील स्थितीसंदर्भात इंडियन एअर फोर्सने जलदगतीने पावले उचलली. या भागात कुठल्याही दुस्साहसाला उत्तर देण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटीबद्ध आहोत” असे भदौरिया म्हणाले.

आणखी वाचा- भारत-चीन संघर्ष : लडाख सीमेवर भारताने तैनात केले ‘टी-९० भीष्म’ टँक; जाणून घ्या जगातील या सर्वोत्तम रणगाड्यांबद्दल

“अलीकडेच राफेल फायटर विमानांचा ताफ्यात झालेला समावेश, त्याआधी C-17 ग्लोबमास्टर विमान, चिनूक आणि अपाची हेलिकॉप्टपरच्या समावेशामुळे इंडियन एअर फोर्सच्या रणनितीक क्षमतेमध्ये मोठी वाढ झाली आहे” असे भदौरिया म्हणाले.

आणखी वाचा- ‘अलर्ट राहा, भारत अचानक हल्ला करु शकतो’, निवृत्त चिनी जनरलने बोलून दाखवली भीती

“भविष्यात कुठल्याही युद्धात आपल्या विजयामध्ये हवाई शक्तीची भूमिका महत्त्वाची असेल. त्यामुळेच आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत तांत्रिकदृष्टया सरस ठरण्याचा आमचा प्रयत्न असतो” असे भदौरिया यांनी सांगितले. फ्रेंच बनावटीची पाच राफेल फायटर विमाने १० सप्टेंबरला वायू दलात औपचारिकरित्या दाखल झाली. मागच्या काही आठवडयात राफेल विमानांनी लडाखमध्ये सुद्धा हवाई कसरती केल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Security scenario in eastern ladakh at uneasy no war no peace iaf chief dmp
First published on: 29-09-2020 at 13:18 IST