काश्मीर खोऱ्यात सरकार आणि सैन्याविरोधात महिलांची आंदोलने घडवून आणण्यासाठी आपल्याला परदेशातून पैसा मिळत होता, अशी कबुली जम्मू आणि काश्मीरमधील फुटिरतावादी महिला नेता आसिया अंद्राबी हीने रविवारी राष्ट्रीय तपास पथकासमोर (एनआयए) दिली आहे. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


एनआयएच्या चौकशीदरम्यान आसिया अंद्राबीने हे मान्य केले की, ती परदेशातील काही संघटनाकडून पैसे घेत होती. या पैशांच्या बदल्यात ती ‘दुखतारन-ए-मिल्लत’ या आपल्या संघटनेमार्फत काश्मीर खोऱ्यात महिलांची आंदोलने घडवून आणत होती.


एनआयएने म्हटले की, २०११ नंतर मलेशियात अंद्राबीच्या मुलाला शैक्षणिक खर्चासाठी परदेशातील जहूर वटाली (अहमद शाह) या हवाला एजंटच्या माध्यमातून पैसा मिळत होता ही बाब तिच्या निदर्शनास आणून देण्यात आली. वटाली हा हवालाच्या प्रमुख एजंटांपैकी एक असून त्याला पाकिस्तानकडून पैसा मिळतो.

एनआयएच्या माहितीनुसार, मुस्लीम लीगचा नेता मसरत आलम याने पाकिस्तानी एजंटांकडून हवाला ऑपरेटर्सच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमध्ये पैसे पाठवले होते. मसरत आलम हा काश्मीर खोऱ्यात दगडफेक करणाऱ्यांचा आणि आंदोलकांचा तथाकथीत पोस्टर बॉय मानला जात होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Separatist asiya andrabi admitted she had been collecting funds donations from foreign sources to nia aau
First published on: 16-06-2019 at 20:27 IST