Seven Dead In Chopper Crash उत्तराखंड या ठिकाणी हेलिकॉप्टरचा अपघात होऊन पायलटसह सहा भाविकांचा मृत्यू झाला. ही घटना काही तासांपूर्वीच घडली. अहमदाबाद विमान अपघाताची घटना ताजी असतानाच ही घटना घडली आहे. दरम्यान मागच्या सहा आठवड्यातली ही पाचवी घटना आहे.
पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी अपघात
उत्तराखंड या ठिकाणी हेलिकॉप्टरचा अपघात हा पहाटे ५.२० मिनिटांनी झाला. हे हेलिकॉप्टर केदारनाथहून गुप्तकाशीला चाललं होतं. मृतांमध्ये पाच प्रवासी, एक लहान मूल आणि हेलिकॉप्टर पायलट अशा सात जणांचा समावेश आहे. हे प्रवासी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात येथील होते. घटनास्थळी तातडीने एनडीआरएफ आणि एसडीआरफची पथकं रवाना झाली. दरम्यान ही मागच्या सहा आठवड्यातली पाचवी घटना आहे.
८ मे रोजी भागीरथी नदीजवळ कोसळलं होतं हेलिकॉप्टर
८ मे रोजी उत्तरकाशीतील गंगणी येथे भागीरथी नदीजवळ हेलिकॉप्टर कोसळलं. या अपघातात पायलटसह ६ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बरेली येथील आई-मुलीचाही समावेश होता. हेलिकॉप्टर गंगोत्री धामला जात होते. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, सात आसनी हेलिकॉप्टरमध्ये पायलट रॉबिनसह पाच महिला आणि दोन पुरुष होते. हे हेलिकॉप्टर अहमदाबाद येथील एअरोट्रान्स सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे होते. हे हेलिकॉप्टर गुजरातच्या अहमदाबाद येथील एअरोट्रान्स सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे होते. ते बेल (बेल-व्हीटी-क्यूएक्सएफ) हेलिकॉप्टर होते.
१७ मे रोजीही हेलिकॉप्टरला अपघात
१७ मे रोजी उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये एअर अॅम्ब्युलन्स हेलिकॉप्टर कोसळलं. हेलिकॉप्टरमध्ये पायलट, डॉक्टर आणि नर्स असे तीन जण होते. तिघेही या अपघातातून सुदैवाने बचावले. हेलिकॉप्टर ऋषिकेश एम्समधून एका रुग्णाला घेण्यासाठी केदारनाथला येत होते. लँडिंग करताना अचानक हेलिकॉप्टर नियंत्रणाबाहेर गेले आणि जमिनीवर कोसळले. हेलिकॉप्टरच्या टेल बूम तुटल्यामुळे हा अपघात झाला होता.
७ जूनची घटना आणि रस्त्यावर लँडिंग
तांत्रिक बिघाडामुळे उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे ७ जून रोजी रस्त्यावर हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. यादरम्यान, हेलिकॉप्टरचा मागील भाग कारवर पडला आणि तुटून बाजूला पडला. यामध्ये एका कारचेही पूर्णपणे नुकसान झाले होते. तर हेलिकॉप्टरच्या पंख्यामुळे महामार्गावर बांधलेल्या दुकानाचे शेडचे नुकसान झाले. यादरम्यान, दुकानात बसलेल्या लोकांनी पळून जाऊन आपले प्राण वाचवले. हेलिकॉप्टरने बदासू हेलिपॅडवरून केदारनाथसाठी उड्डाण केले, ज्यामध्ये पायलटसह सहा प्रवासी होते. अपघातात पायलटला किरकोळ दुखापत झाली आहे. याशिवाय इतर प्रवासी सुरक्षित होते. आता पुन्हा एकदा उत्तराखंडला जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला असून पायलटसह सर्वांचा मृत्यू झाला आहे.
नेमकी ही घटना काय घडली?
उत्तराखंडचे एडीजी डॉ. व्ही मुरुगेशन यांनी दिलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टर देहरादूनहून केदारनाथच्या दिशेने निघालं होतं. आर्यन अॅव्हिएशन कंपनीचं हे हेलिकॉप्टर गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायणच्या दरम्यान खाली कोसळलं. दाट धुकं आणि कमी दृश्यता यामुळे हेलिकॉप्टरच्या पायलटने नियंत्रण गमावलं असण्याची शक्यता आहे. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे अशी माहितीही मुरुगेशन यांनी दिली.