scorecardresearch

महिलांना दमदाटी करण्यात खरा पुरुषार्थ नाही, लैंगिकतेबाबत मुलांना शिकवण देणं गरजेचं; केरळ उच्च न्यायालयाचं मत

महिलांना हिनवण्यात खरा पुरुषार्थ नसून मुलांना लैंगिकते बाबत शिकवणं गरजेचं आहे, असं मत केरळ उच्च न्यायालयाने शुक्रवारी व्यक्त केलं.

महिलांना दमदाटी करण्यात खरा पुरुषार्थ नाही, लैंगिकतेबाबत मुलांना शिकवण देणं गरजेचं; केरळ उच्च न्यायालयाचं मत
फोटो द इंडियन एक्सप्रेस

महिलांना दमदाटी करण्यात खरा पुरुषार्थ नसून मुलांना लैंगिकतेबाबत शिकवणं गरजेचं आहे, असं मत केरळ उच्च न्यायालयाने शुक्रवारी व्यक्त केलं. शाळा-महाविद्यालयांत विद्यार्थिनींवरील वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांचा दखल घेत न्यायालयाने ही टीप्पणी केली. तसेच वर्तवणूक आणि शिष्टाचाराबाबत शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन अभ्यासक्रमात शिकवलं जावं, असेही ते म्हणाले.

हेही वाचा- मोदींवरील माहितीपट हटवा;नव्या माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार केंद्र सरकारचे यूटय़ूब, ट्विटरला आदेश

केरळमधील एका महाविद्यालयात विद्यार्थीनीची छेड काढल्याप्रकरणी केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायमुर्ती देवन रामचंद्रन यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी पार पडली. यावेळी मागील काही वर्षात मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. तसेच विद्यार्थ्यांच्या मुल्यशिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज असून प्राथमिक स्तरावरच विद्यार्थ्यांना चांगली वर्तवणूक आणि शिष्टाचाराबाबत धडे देणे आवश्यक आहे, असं मत न्यायालयाने व्यक्त केलं.

हेही वाचा – जोशीमठमधील लोकांची करायची होती मदत, एकट्याने केला ३०० किमी प्रवास, पण ऐनवेळी गाडी खोल दरीत कोसळली; पादरीचा दुर्दैवी मृत्यू

लैंगिक अत्याचाराचा आरोप प्रत्येकवेळी मुलांवरच होतो, मुलींवर क्वचितच हे आरोप केले जातात. त्यामुळे सर्वांनी यावर विचार करण्याची वेळ आली आहे. महिलांना हिनवण्यात खरा पुरुषार्थ नाही, हे विद्यार्थ्यांना शिकवणं गरजेचं आहे. मुलींच्या सहमती शिवाय तिला स्पर्श करू नये, हे प्रत्येक मुलाला समजावून सांगणं आवश्यक आहे, असेही न्यायालयाने म्हटले. दरम्यान, यासुनावणीनंतर निकालाची प्रत केरळ सरकारचे मुख्य सचिव, उच्च शिक्षण विभाग, विद्यापीठ अनुदान आयोग आणि शिक्षण मंडळांना देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-01-2023 at 12:17 IST

संबंधित बातम्या