scorecardresearch

Premium

शबाना आजमी यांना मागावी लागली भारतीय रेल्वेची जाहीर माफी

शबाना आजमी यांनी ट्विटरला एक व्हिडीओ पोस्ट केला होता ज्यामध्ये कर्मचारी घाणेरड्या पाण्यात प्लेट्स धुत होते

Azmi Shabana
शबाना आझमी

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आजमी यांना भारतीय रेल्वेची माफी मागावी लागली आहे. झालं असं की, शबाना आजमी यांनी ट्विटरला एक व्हिडीओ पोस्ट केला होता ज्यामध्ये कर्मचारी घाणेरड्या पाण्यात प्लेट्स धुत होते. हे कर्मचारी भारतीय रेल्वेचे आहेत असं समजत शबाना आजमी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनाही टॅग केलं होतं. शबाना आजमी यांनी पोस्ट केलेल्या ३० सेकंदाच्या व्हिडीओत काही कर्मचारी खड्ड्यात साचलेल्या घाणेरड्या पाण्यात प्लेट्स धुताना दिसत होते. सोमवारी सकाळी शबाना आजमी यांनी व्हिडीओ पोस्ट करत पियूष गोयल यांना पाहण्याचं आवाहन केलं होतं. संध्याकाळी रेल्वे मंत्रालयाने स्पष्टीकरण देत त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली.

मॅडम हा व्हिडीओ मलेशिअन रेस्टॉरंटमधील असल्याचं रेल्वे मंत्रालायने ट्विटरला रिप्लाय देत सांगितलं. यावेळी त्यांनी एक बातमीची लिंकही सोबत दिली. यानंतर लगेचच आपली चूक लक्षात येताच शबाना आजमी यांनी माफी मागितली. पण तोपर्यंत ट्विटरकरांना आयती संधी मिळाली होती. त्यांनी शबाना आजमी यांना ट्रोल करत रेल्वेला त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्यास सांगितलं. यानंतर शबाना आजमी यांनी आपण पुन्हा एकदा आपण बिनशर्त माफी मागितलं असल्याचं सांगितलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shabana azmi aplogise indian railway

First published on: 07-06-2018 at 04:07 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×