राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप केला. तसेच देशातील ज्या राज्यात भाजपाची सत्ता नाही तेथे आमदार, खासदार आणि मंत्र्यांवर कारवाया केल्या जात असल्याचं म्हटलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील एका आमदाराचंही उदाहरण दिलं. तसेच हा आमदार काँग्रेसचा होता आणि तो भाजपात गेल्याचा किस्सा सांगितला. ते मंगळवारी (२३ ऑगस्ट) दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले, देशात जेथे भाजपाची सत्ता नाही त्या राज्यात केंद्रीय सत्तेचा दुरुपयोग होत आहे. पश्चिम बंगालमध्ये दररोज या गोष्टी पाहायला मिळत आहेत. कधी आमदाराविरोधात, कधी खासदाराविरोधात आणि कधी मंत्र्यांविरोधात केंद्रीय यंत्रणांचा वापर सुरू आहे. गावाकडे आधी लोकांना पोलीस केस माहिती होती. काही काळाने सीबीआय माहिती झाली. आता ईडीची ओळख झाली.”

“गावाकडे विचारतात ईडी काय आहे? आता शेतकरी गावाकडे काही गोंधळ झाला तर सहकाऱ्यांना व्यवस्थित वाग, नाहीतर मी तुझ्यामागे ईडी लावेन असा इशारा देतो,” असं म्हणत शरद पवारांनी ईडीवर निशाणा साधला.

“भाजपात गेलो आणि आता मला अगदी व्यवस्थित झोप येते”

शरद पवार पुढे म्हणाले, “मी काही भाजपाच्या नेते आणि आमदारांची वक्तव्ये पाहिली. आमच्याकडे महाराष्ट्रात आधी काँग्रेसमध्ये असलेले एक आमदार आता भाजपात गेले. त्यांना पत्रकारांनी विचारलं की तुम्ही असं का केलं? ते म्हणाले की, मी पक्ष बदलला, भाजपात गेलो आणि आता मला अगदी व्यवस्थित झोप येते. आता माझ्यामागे ईडी नाही.”

हेही वाचा : “१५ ऑगस्टला महिलांच्या सन्मानाविषयी बोलायचं आणि दोन दिवसांनी…”, शरद पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“भाजपाकडे एक धुलाईचं मशिन आहे. त्यात गेलं की नेते स्वच्छ होऊन बाहेर येतात,” असा टोलाही पवारांनी लगावला.