scorecardresearch

Premium

तुम्ही भाजपवाल्यांना खोट्या बातम्या आणि अफवा पसरवण्याची संधी देताय; प्रणव मुखर्जींना मुलीनेच सुनावलं

‘तुमचं भाषण विसरलं जाईल, फक्त व्हिजुअल्स राहितील. खोटी वक्तव्यं जोडून तुमचे व्हिजुअल्स परसवले जातील’

तुम्ही भाजपवाल्यांना खोट्या बातम्या आणि अफवा पसरवण्याची संधी देताय; प्रणव मुखर्जींना मुलीनेच सुनावलं

काँग्रेससहित अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतरही माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बुधवारी नागपुरात पोहोचले आहेत. गुरुवारी प्रणव मुखर्जी आरएसएस कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. प्रणव मुखर्जी कार्यक्रमात सहभागी होत असल्याने आता त्यांच्या मुलीनेही उघड नाराजी व्यक्त केली आहे. तुम्ही भाजपवाल्यांना खोट्या बातम्या आणि अफवा पसरवण्याची संधी देत आहात असं शर्मिष्ठा मुखर्जी यांनी म्हटलं आहे. ट्वि़टरच्या माध्यमातून त्यांनी आपल्या वडिलांना थेट सुनावलं आहे.

शर्मिष्ठा मुखर्जी भाजपात प्रवेश करत असल्याचं काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं. यावरही शर्मिष्ठा मुखर्जी यांनी वक्तव्य केलं आहे. ‘आजच्या घटनेवरुन भाजपा किती घाणेरडं राजकारण करत आहे याची तुम्हाला कल्पना आली असेल अशी अपेक्षा. तुमचं भाषण विसरलं जाईल, फक्त व्हिजुअल्स राहितील. खोटी वक्तव्यं जोडून तुमचे व्हिजुअल्स परसवले जातील’, असा थेट आरोपच शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आरएसएसवर केला आहे.

Infosys Narayana Murthy Consumer Brand
Narayan Murthy: ”लोकांना वाटते त्यांच्याकडे विशिष्ट फोन अन् घड्याळ असेल तर…,” नारायण मूर्तींनी यशस्वी ब्रँडसाठी दिल्या महत्त्वाच्या टिप्स
50 percent of type 2 diabetes patients asymptomatic what tests should they take to detect their condition doctor said
५० टक्के लोकांना टाईप २ डायबिटीसची लक्षणे दिसत नाहीत! तुम्हीही कोणत्या चाचण्या करून घ्यायला हव्या?
Innova Crysta waiting period
Ertiga ला तगडं आव्हान देणाऱ्या ‘या’ ८ सीटर MPV कारला ग्राहकांची मोठी मागणी, वेटिंग पीरियड पोहोचला ७ महिन्यांवर
Which expenses and investments are eligible for tax relief
Money Mantra : ‘हे’ खर्च आणि गुंतवणूक’ कर सवलतीस पात्र आहेत हे तुम्हाला माहितेय का?

पुढच्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘नागपूरला जाऊन तुम्ही भाजपा आणि आरएसएसला खोट्या बातम्या पेरण्याची आणि अफवा पसरवण्याची संधी देत आहात. ही फक्त सुरुवात आहे’.

प्रणव मुखर्जी यांनी कार्यक्रमात सहभागी होण्यास होकार दिल्यापासूनच वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या निर्णयानंतर काँग्रेस पक्षात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत आता प्रणव मुखर्जी आरएसएसच्या कार्यक्रमात नेमकं काय बोलतात याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

प्रणव मुखर्जी दोन दिवस राजभवनात थांबणार आहेत. गुरुवारी संध्याकाळी ६.३० वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी वैचारिक मतभेद असल्याने आरएसएसच्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचं आवाहन प्रणव मुखर्जींना केलं होतं. यानंरही त्यांनी आपला निर्णय बदललेला नाही.

नागपुरात आरएसएसच्या तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाला प्रणव मुखर्जी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ही परिक्षा उत्तीर्ण होणारे पुढे जाऊन पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम करतात. या वर्गात देशभरातून ८०० तरुण स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sharmistha mukherjee express dissatisfaction over father pranav mukherjee rss program

First published on: 07-06-2018 at 00:48 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या
तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×