प्रसीद्ध कारनिर्माती कंपनी स्कोडाने आपली नवीन गाडी ‘सुपर्ब स्पोर्टलाइन एडिशन’चे फोटो अधिकृत संकेतस्थळावर टाकून ही गाडी ‘लिस्ट’ केली आहे. त्यामुळे लवकरच ही गाडी भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, कंपनीकडून अद्याप याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. यापूर्वीच ही गाडी युरोपमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.

युरोपात लॉन्च केलेल्या सुपर्ब स्पोर्टलाइनमध्ये 18 आणि 19 इंचाचे ग्लोसी ब्लॅक अलॉय व्हिल्स आणि अनेक शानदार फिचर्स देण्यात आले आहेत. मात्र, भारतात येऊ घातलेल्या सुपर्ब स्पोर्टलाइनमध्ये कंपनी युरोपात लॉन्च केलेल्या मॉडेलप्रमाणे फिचर देण्याची शक्यता कमीच असल्याचंही म्हटलं जात आहे.

काय असेल किंमत –
भारतात उपलब्ध असलेल्या सध्याच्या रेग्युलर सुपर्बपेक्षा ही गाडी थोडी महागडी असेल अशीही चर्चा रंगली आहे. रेग्युलर सुपर्बची किंमत (एक्स-शोरूम) 25.59 लाखांपासून 32.99 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

सध्या भारतात उपलब्ध असलेल्या रेग्युलर सुपर्बमध्ये दोन व्हेरिअंट्स – Style आणि L&K आहेत. या दोन्ही व्हेरिअंट्समध्ये 1.8-लिटर TSI पेट्रोल इंजिन किंवा 2.0-लिटर TDI डीझेल इंजिनचे पर्याय आहेत. 1.8-लिटर TSI इंजिन 177bhp ची पावर आणि 320Nm टॉर्क जनरेट करतं. या इंजिनमध्ये ट्रांसमिशनसाठी 6-स्पीड मॅन्युअल किंवा 7-स्पीड DSG गिअरबॉक्स आहे. तर, 2.0-लिटर TDI डीझेल इंजिन 175bhp पावर आणि 350Nm टॉर्क तयार करतं. यामध्ये मॅन्युअल गिअरबॉक्सचा पर्याय देण्यात आलेला नाही.