scorecardresearch

Premium

Free Condoms: १८ ते २५ वयोगटातील सर्वांना मिळणार फ्री कंडोम! ‘या’ देशाच्या राष्ट्रध्यक्षांनीच केली घोषणा; दोन कारणांमुळे घेतला निर्णय

Free condoms for 18-25 year old people: देशातील कोणत्याही औषध विक्रेत्याकडे वयाचा पुरावा सादर केल्या मोफत कंडोम मिळणार

France announces free condoms
देशाच्या राष्ट्राध्यक्षांनीच एका चर्चासत्रामध्ये केली घोषणा (फाइल फोटो, सौजन्य रॉयटर्स)

France announces free condoms for anyone under 25: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी देशातील सार्वजनिक आरोग्याविषयक प्रश्नावर तोडगा म्हणून मोठी घोषणा केली आहे. देशातील सर्व तरुण व्यक्तींना मोफत कंडोम उपलब्ध करुन दिले जातील असं मॅक्रॉन यांनी जाहीर केलं आहे. लहान वयामध्येच तरुणी गरोदर होण्याचं प्रमाण फ्रान्समध्ये फार जास्त आहे. त्यावरच तोडगा म्हणून मॅक्रॉन सरकारने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेण्यामागील दोन प्रमुख कारणांपैकी एक कारण हे लैंगिक आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचंही आहे.

कुठे आणि कसे मिळणार हे फ्री कंडोम?

“ही गर्भनिरोधकांसंदर्भातील छोटीशी क्रांती आहे,” असं राष्ट्रध्यक्ष मॅक्रॉन यांनी ही घोषणा करताना म्हटलं. १८ ते २५ वयोगटातील व्यक्तींना मोफत कंडोम पुरवले जातील असं मॅक्रॉन यांनी म्हटलं आहे. प्लाटीज शहरामध्ये आयोजित आरोग्यविषयक चर्चासत्रामध्ये सहभागी झालेल्या मॅक्रॉन यांनी चर्चासत्रादरम्यानच ही घोषणा केली. देशातील कोणत्याही औषध विक्रेत्याकडे वयाचा पुरावा सादर केल्यानंतर १८ ते २५ वयोगटातील व्यक्तींना मोफत कंडोम दिले जातील अशी ही योजना आहे.

Babanrao Taiwade
मराठा आरक्षणाच्या निर्णयावर तायवाडे समाधानी, म्हणाले…
jayant chaudhary
दहा दिवसांनंतरही रखडतोय RLD चा NDA प्रवेश; भाजपाच्या मनात नेमके काय?
ajit pawar refuse rr patil group felicitation
राष्ट्रवादी पक्षप्रकरणी निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “लोकशाहीत बहुमताला…”
Raj Thackeray on ED Action BJP
“भाजपाला भविष्यात ईडीचं राजकारण…”, राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सूचक इशारा; म्हणाले…

तो धक्कादायक अहवालही ठरला कारणीभूत

आरोग्यविषयक विभागांनी फ्रान्समधील लैंगिक आजारासंदर्भातील धक्कादायक माहिती नुकतीच जाहीर केल्याचं वृत्त ‘रॉयट’र्स या वृत्तसंस्थेनं दिलं होतं. २०२० ते २०२१ दरम्यान लैंगिक आजारांचे प्रमाण म्हणजे एसटीडी प्रकारातील आजारांच्या रुग्णसंख्येत ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचं फ्रान्समधील आरोग्यविषयक विभागांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर सध्या जाहीर केलेला निर्णय हे प्रमाण कमी करण्यासाठी फायदाचा ठरु शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नक्की वाचा >> Single Cigarette Ban: लवकरच देशात ‘सिंगल सिगारेट विक्री’वर बंदी? मोदी सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत? ‘त्या’ अहवालामुळे चर्चा

महिलांना आधीपासूनच मोफत साहित्य वाटप

मोफत कंडोम देण्याचा हा निर्णय मॅक्रॉन सरकारने घेण्याआधीच २५ वर्षांखालील महिलांना गर्भनिरोधक साहित्याचं मोफत वाटप सरकारच्या माध्यमातून केलं जात होतं. तरुण महिलांना गर्भनिरोधक साहित्य परवडत नाही म्हणून त्यांनी त्याचा वापर केला नाही असं होऊ नये या उद्देशाने मॅक्रॉन सरकारने या साहित्य वाटपाचा निर्णय घेतला होता. यामध्ये प्रामुख्याने गर्भनिरोधक गोळ्यांचा समावेश होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Small revolution for contraception france announces free condoms for anyone under 25 scsg

First published on: 12-12-2022 at 14:37 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×