साप चावल्याने २४ तासांत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये ३ वर्षांच्या एका मुलाचाही समावेश आहे. कर्नाटकातील ही घटना असून यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील ही घटना आहे. एका घरात विषारी साप शिरला होता. सोमवारी सकाळी तीन वर्षांचा मुलगा किर्तनचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या मुलाचा मृत्यू साप चावल्याने झाला होता. मुलाचा मृत्यू झाल्याचे ऐकल्यानंतर त्याचा धक्का बसून त्याची आई रंजिताचाही मृत्यू झाला. त्याचदिवशी रात्री रंजिताचे काका मदनप्पा यांनाही साप चावला. रूग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हे वृत्त गावात पसरताच सर्वांनी रंजिताच्या घरात साप शोधण्यास सुरूवात केली. साप सापडल्यानंतर सर्वांनी त्याला मारले. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Snake bite 3 family members dies in karnataka
First published on: 11-07-2017 at 15:03 IST