कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. २२४ जागांसाठी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरूवातीला हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजपाने आघाडी घेतली आहे. कर्नाटकाचा कल भाजपच्या बाजूने येताच सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. कर्नाटक निवडणुकीच्या मतमोजणीचा आणि भाजपच्या बहुमताचा थेट परिणाम नेटकऱ्यांवर झाला असून गमतीशीर मीम्स आणि विनोद चांगलेच व्हायरल होत आहेत.

सुरूवातीचा काही काळ काँग्रेसने आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर भाजपाने जोरदार मुसंडी मारत काँग्रेस आणि जेडीएस या दोन्ही पक्षांना बरंच पाठी टाकलं. भाजपचे आकडे जसजसे वाढले तसे विविध जोक्स सोशल मीडियावर ट्रेण्ड होत असल्याचं पाहायला मिळालं.

https://twitter.com/James_Beyond/status/996245464445083649

वरील सर्व ट्विट आणि मीम्स हे नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर शेअर केले असून ‘लोकसत्ता ऑनलाइन’ त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.