आधीच छापा प्रकरणावरून वादग्रस्त राहीलेले दिल्लीचे कायदामंत्री सोमनाथ भारती आज पुन्हा नव्या वादात सापडले आहेत. प्रसारमाध्यमांनी मोदींकडून पैसे घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, त्यानंतर त्यांना थोड्यावेळाने सर्व पत्रकारांची माफी मागावी लागली.
परदेशी महिलांसोबत केलेल्या गैरवर्तणुकीबाबत सोमनाथ भारतींना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. यावर सोमनाथ भारती  भडकले. भाजपच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी किती पैसे दिले, असा प्रश्न त्यांनी प्रसारमाध्यमांना विचारला. यानंतर मात्र क्षमा मागत माझ्या वक्तव्याचा चूकीचा अर्थ घेतला गेला, असे म्हणत सोमनाथ भारतींनी आपले वक्तव्य मागे घेतले. दक्षिण दिल्लीत मध्यरात्री आफ्रिकन महिलांचा अपमान केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. योगगुरू रामदेवबाबांनी अरविंद केजरीवाल यांना सोमनाथ भारतींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.