वडिलांच्या संपत्तीबाबत मुलगा आणि सूनेने दाखल केलेली याचिका फेटाळताना दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी आई-वडिलांच्या बाजुने महत्त्वाचा निर्णय दिला. मुलाची वैवाहिक स्थिती कशीही असो, पण वडिलांनी बांधलेल्या घरात राहण्याचा त्याला कोणताही कायदेशीर अधिकार नाही. आई-वडिलांच्या ‘दये’वरच मुलगा त्यांच्या घरात राहू शकतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आई-वडील हे मुलांना आपल्या घरात राहण्याची परवानगी देतात. पण त्यांच्यातील संबंधांमध्ये वितुष्ट निर्माण झाल्यानंतरही आयुष्यभर आई-वडील आपल्या मुलांचे ‘ओझे’ सहन करतील, असा याचा अर्थ होत नाही, असेही न्यायालयाने निर्णय देताना स्पष्ट केले. आई-वडिलांनी आपल्या कष्टाने घर बांधले असेल आणि मुलाचे लग्न झालेले असो अथवा नसो, त्याला त्या घरात राहण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही, असे न्या. प्रतिभा राणी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. जोपर्यंत त्यांची परवानगी आहे आणि त्यांच्या दयेवरच मुलगा त्या घरात राहू शकतो, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Son has no legal right in parents house says delhi high court
First published on: 29-11-2016 at 19:37 IST