फ्रान्समध्ये मोहम्मद पैगंबर यांच्या वादग्रस्त व्यंगचित्रावरुन पेटलेल्या वादानंतर देशातील वेगवेगळ्या संप्रदायांमध्ये होणाऱ्या हिंसक घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. फ्रान्सच्या बेलफोर्ट येथे असाच एक विचित्र प्रकार समोर आळा आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार एका मुस्लीम पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाला त्यांच्याच कट्टरतावादी मित्रांनी बेदम मारहाण केली. या मुलाने नाताळानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीला हजेरी लावल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आली. पाच जणांनी या मुलाला बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केलं. या मुलाची आई मुस्लीम आहे तर सावत्र वडील हे मुस्लीम नसल्याच्या रागातूनही ही मारहाण करण्यात आली. या मुलाचे आई-वडील दोघेही फ्रान्समध्ये पोलीस दलातच काम करतात.
फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डारमनिन यांनी या घटनेसंदर्भात माहिती देताना संबंधित तरुणाने नाताळानिमित्त आयोजित पार्टीचे काही फोटो स्नॅपचॅटवर शेअर केले होते. त्यानंतर या फोटोंवर त्यांच्या फ्रेण्डलिस्टमधील काही व्यक्तींनी वादग्रस्त कमेंट करण्यास सुरुवात केली. “गोऱ्या व्यक्तीचा वाईट मुलगा”, “सापाचा मुलगा”, “हा पोलिसाचा मुलगा आहे का” अशा अनेक कमेंट या फोटोवर मुलाच्या ओळखीतील मुस्लीम कट्टरतावादी मित्रांनी केल्या होत्या. तसेच एका व्यक्तीने तर थेट “खरे अरबी लोकं कसे असतात हे मी तुला दाखवतो,” अशा शब्दांमध्ये या मुलाला कमेंटमधून धमकी दिली.
कोंबड्या वाहून नेणारा ट्रक उलटला; मदतीऐवजी कोंबड्या पकडून घरी नेण्यासाठी सारा गाव लोटलाhttps://t.co/WUfk46XzlY
“गाडीमध्ये एक हजार कोंबड्या होत्या केवळ ३००-३५० शिल्लक राहिल्या”#Accident #MadhyaPradesh— LoksattaLive (@LoksattaLive) December 30, 2020
हे लोकं केवळ कमेंट करुन थांबले नाही तर त्यांनी या मुलाला एका कार पार्किंगमध्ये भेटण्यासाठी बोलवलं. हा मुलगा तेथे पोहचला असता या पाच जणांनी त्याला बेदम मारहाण केली. या मुलाच्या तोंडावर तसेच शरीरावर अनेक जखमा झाल्या असून मोठ्याप्रमाणात रक्तस्त्रावही झाला. पोलिसांनी या प्रकऱणामध्ये पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. मुस्लिमांनी नाताळ साजरा करु नये असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही त्याला मारहाण केली, असं मुख्य आरोपीने पोलिसांना सांगितलं. तसेच या मुलाने नाताळाच्या पार्टीमधील टाकलेले फोटो आणि तेथील खाद्य पदार्थांचा तो अस्वाद घेत आहे हे पाहून आमचा संताप झाल्याचेही आरोपींनी म्हटलं आहे.
लाच म्हणून एक किलो पेढे मागणारा पोलीस अधिकारी निलंबितhttps://t.co/Z6992uGXKB
किमान तोंड तरी गोड कर असं म्हणत केली पेढ्यांची मागणी#Bihar #BiharPolice #Bribe #Corruption— LoksattaLive (@LoksattaLive) December 30, 2020
फ्रान्समधील मंत्र्यांनी या हल्ल्याला वंशभेद करणारा हल्ला असल्याचे म्हटलं आहे. असे कट्टरतावादी हे फ्रान्समधील विभाजनकारी शक्तींचे प्रतिक असून ते फ्रान्समधील मूल्यांना हानी पोहचवत आहे, असंही गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. यापूर्वीच फ्रान्स सरकारने इस्लामिक कट्टरतावाद्यांना तोंड देण्यासाठी नवीन कायदा केला आहे. महिला आणि पुरुष या आधारावर स्विमिंग पूलचे वर्गिकरण करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच तीन वर्षांच्या मुलांना शाळेत पाठवणं बंधनकारक करण्यात आलं आहे.