Rinku Majumdar Son Found Dead : कोलकात्याच्या न्यूटाऊन परिसरात, टेक्नो सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत, रिंकु मजूमदार यांचा मुलगा रहस्यमय परिस्थितीत मृत अवस्थेत आढळला आहे. रिंकु या भाजपाचे प्रमुख नेते दिलीप घोष यांच्या पत्नी आहेत. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

प्रीतम उर्फ श्रीनजय (वय २८) असे मृत तरुणाचे नाव असून, तो रिंकु मजूमदार यांचा त्यांच्या पहिल्या विवाहातून झालेला मुलगा होता. तो सॉल्ट लेक येथील एका आयटी कंपनीत काम करत होता. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे.

प्राथमिक तपासात आत्महत्येची शक्यता वर्तवली जात असली तरी, सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी आर. जी. कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिंकू मजूमदार यांच्या लग्नाची चर्चा

रिंकु मजूमदार या स्वतःही भाजपाशी संबंधित आहेत. त्यांनी अलीकडेच दिलीप घोष यांच्याशी विवाह केला. त्यांच्या पहिल्या लग्नातील मुलाने त्यांच्या या निर्णयाला आनंदाने पाठिंबा दिला होता. “मी खूप आनंदी आहे, समाधानी आहे. आईच्या लग्नाच्या निर्णयाला मी पूर्णपणे पाठिंबा दिला होता आणि नेहमीच देत राहीन”, असं त्याने लग्नानंतर सांगितलं होतं. कोलकात्यात या विवाहाची मोठी चर्चाही रंगली होती. परंतु, या विवाहावेळी तो शहराबाहेर होता.