हरयाणातील भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. सोनाली फोगट यांचं गोव्यामध्ये निधन त्यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि फोगट यांच्या दोन साथीदारांना अटक केली. या घटनेचा तपास सुरू असताना पोलिसांना फोगट यांच्या मृत्यूआधीच्या काही तासांपूर्वीचं सीसीटीव्ही फुटेजही मिळालं आहे. एकीकीडे या घडामोडी सुरू असताना आता दुसरीकडे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाचा तपासासाठी गरज पडल्यास सीबीआयकडे चौकशीसाठी सहमती दर्शवली आहे.

“हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी बोलून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची विनंती केली. सोनाली फोगट यांच्या कुटुंबीयांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तशी विनंती केली असून, सीबीआयने हे प्रकरण ताब्यात घ्यावे अशी त्यांची इच्छा आहे. मला यात काही अडचण नाही. आज सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यावर, गरज पडल्यास मी हे प्रकरण सीबीआयकडे देईन.” असे गोव्याचे मुख्यमंत्री एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले आहेत.

हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करण्यासंदर्भात हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा प्रमोद सावंत यांना फोन आल्यानंतर सावंत यांनी माध्यमांशी बोलताना वरील विधान केलं आहे. शिवाय, शनिवारी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सोनाली फोगटच्या कुटुंबीयांना तिच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता भविष्यात सोनाल फोगाट मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे जाण्याची शक्यता दिसत आहे.

Video : सोनाली फोगट मृत्य प्रकरण, पार्टीदरम्यानचा आणखी एक व्हिडीओ समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिळालेल्या माहितीनुसार फोगट यांच्या मृत्यू होण्याच्या आदल्या रात्री त्या ज्या रेस्टॉरंटमध्ये पार्टी करत होत्या त्या रेस्टॉरंचा मालक एडविन न्युन्स आणि ड्रग्ज डीलर दत्तप्रसाद गावकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. याआधी पोलिसांनी हरियाणामधील भाजपा नेत्याचे सहकारी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांना १० दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.