डी.के. रवी आत्महत्या प्रकरणास वेगळे वळण?

आयएएस अधिकारी डी.के. रवी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी तासभर अगोदर आपल्या सहकारी महिला आयएएस अधिकाऱ्यासमवेत तब्बल ४४ वेळा संपर्क साधल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून त्यामुळे या प्रकरणास वेगळे वळण लागण्याची दाट चिन्हे आहेत.

आयएएस अधिकारी डी.के. रवी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी तासभर अगोदर आपल्या सहकारी महिला आयएएस अधिकाऱ्यासमवेत तब्बल ४४ वेळा संपर्क साधल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून त्यामुळे या प्रकरणास वेगळे वळण लागण्याची दाट चिन्हे आहेत. ही महिला रवी यांच्यासमवेतच आयएएसचे प्रशिक्षण घेत होती, असेही सांगण्यात येते.
दरम्यान,  काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपूर्द करण्याचे आदेश शुक्रवारी दिले.
सदर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपूर्द करण्याची वाढती मागणी होत असतानाच सिद्धरामय्या यांनी सकाळी राज्यपाल वजुभाईवाला यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणाची माहिती दिली.
रवी यांचे कुटुंबीय आणि विरोधी पक्षांनीही सीबीआय चौकशीची आग्रही मागणी केली होती

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sonia asks siddaramaiah to hand over probe to cbi