यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मार्गातील  अडथळे कौशल्याने पार केले असून आता केंद्रात त्या स्थिर आणि निधर्मी सरकार देतील याकडे राष्ट्र डोळे लावून बसले आहे, असे द्रमुकचे नेते एम. करुणानिधी यांनी म्हटले आहे.सोनिया गांधी यांचा उद्या वाढदिवस असून त्याच्या पूर्वसंध्येवर करुणानिधी यांनी त्यांना पाठविलेल्या शुभेच्छा संदेशात उपर्युक्त मत व्यक्त केले आहे. कितीही अडथळे आले तरी काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारने अनेक उद्दिष्टे साध्य केली आहेत, असेही ते म्हणाले.या देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेच्या कल्याणासाठी आपण केलेल्या प्रयत्नांची जनतेला निश्चितच जाणीव झाली आहे, असेही करुणानिधी यांनी म्हटले आहे.