बिहारमधील मजुर दाम्पत्याच्या एका मुलीचं केरळमध्ये अपहरण झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. याप्रकरणी पालकांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. २४ तास कसून तपास केल्यानंतर पोलिसांना त्या मुलीचा मृतदेह सापडला आहे. अवघ्या पाच वर्षांच्या या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. दरम्यान, अपहरणकर्त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

कुमारी दाम्पत्य त्यांच्या मुलीसह केरळ येथे भाड्याने राहत होते. पाच वर्षीय मुलगी इयत्ता पहिलीत शिकत होती. शुक्रवारी दुपारी ३ वाजता ती घरातूनच बेपत्ता झाली. आरोपीने तिचं अपहरण करून ती मुलगी राहत असलेल्या इमारतीच्या वरच्याच मजल्यावर तिला ठेवले होते. तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मद्यधुंद अवस्थेत त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्याने तिची गळा दाबून हत्या केली.

याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्या मुलीची कसून चौकशी केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांचं तपासकार्य सुरू होतं. तपासाअंती या मुलीचा मृतदेह सापडला आहे. जवळच्या अलुवा येथील स्थानिक बाजारपेठेमागील दलदलीच्या भागात एका गोणीत तिचा मृतदेह सापडला.

तपासकार्य थांबवल्यानंतर केरळ पोलिसांनी एक ट्वीट केलं. त्यात ते म्हणाले की, “माफ कर मुली. तुला शोधण्याचे आमचे प्रयत्न अयशस्वी ठरले. मुलीचं अपहरण करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, याप्रकरणावरून आता केरळमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. केरळचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांनी केरळ पोलिसांवर आरोप केले आहे. याप्रकरणात त्यांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला जातोय.