हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना ठार करण्यात आलं आहे. पोलीस एन्काऊंटरमध्ये हे चार आरोपी ठार झाले आहेत. या घटनेनंतर देशभरातून सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठमोठ्या कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून पोलिसांचं कौतुक केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बलात्कारासारखा गुन्हा केल्यानंतर तुम्ही किती लांब पळू शकता?.. धन्यवाद तेलंगणा पोलीस, असं अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिने ट्विट केलं. तर, ‘सकाळी उठल्या उठल्या आज बातमी पाहिली आणि अखेर न्याय मिळाला’, असं नागार्जुन अक्किनेनी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय. ज्युनिअर एनटीआर, राजशेखर, कल्याणराम नंदमुरी, लक्ष्मी मंचु, अल्लू अर्जुन यांसारख्या कलाकारांनीही ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘पीडितेच्या कुटुंबीयांचं दु:ख पुसलं जाणार नाही पण या एन्काऊंटरमुळे कदाचित त्यांना थोडा दिलासा मिळेल’, असं या कलाकारांनी म्हटलंय.

आणखी वाचा : ‘ये नया हिंदुस्थान है, घर में घुसेगा भी और मारेगा भी’; सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव

हैदराबाद बलात्कार प्रकरणी अधिक तपासासाठी पोलिसांनी चारही आरोपींना घटनास्थळी नेलं होतं. त्यावेळी या आरोपींनी त्या ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. परंतु ते न थांबल्यानं पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South indian celebrities praised hyderabad encounter said justice served ssv
First published on: 06-12-2019 at 12:49 IST