नैऋत्य मान्सून आज किंवा उद्या कर्नाटकमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. कर्नाटकच्या नैसर्गिक आपत्ती निरीक्षण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्सूनच्या आगमनाबद्दलची माहिती दिली आहे. नैऋत्य मान्सूनच्या कर्नाटकमधील आगमनाला काही दिवस उशीर झाला आहे.

‘राज्यातील मान्सूनच्या आगमनाला काही दिवसांचा उशीर झाला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाला विलंब झाल्याने आणि बाष्पयुक्त ढग केरळहून पश्चिमेकडे सरकल्याने मान्सूनचे आगमन लांबणीवर गेले आहे,’ अशी माहिती कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती निरीक्षण कक्षाचे संचालक जी. एस. श्रीनिवास रेड्डी यांनी दिली आहे. ‘सोमवारी मध्यरात्रीपासून कमी दाबाचा पट्टा दूर होईल. त्यामुळे मंगळवारपासून बाष्पयुक्त ढग पश्चिमेकडे सरकणार नाहीत,’ असे श्रीनिवास रेड्डी यांनी पुढे म्हटले.

कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती निरीक्षण कक्षाने याआधी २९ मे रोजी मान्सून राज्यात दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा आणि वाऱ्याची स्थिती यामुळे मान्सून येण्यास विलंब झाला.