स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या राजस्थान रॉयल्सचा क्रिकेटपटू अंकित चव्हाण याला दिल्लीतील सत्र न्यायालयाने गुरुवारी अंतरिम जामीन मंजूर केला. लग्नासाठी अंकित चव्हाणला सहा जूनपर्यंत जामीन मंजूर करण्यात आला. एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
आयपीएलच्या सामन्यांमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप अंकित चव्हाणवर आहे. त्याचसाठी त्याला १६ मे रोजी मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमधून दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने अटक केली होती. त्याच्याबरोबर राजस्थान रॉयल्सचा एस. श्रीशांत आणि अजित चंडिला यांनाही पोलिसांनी अटक केली होती. या दोघांची ४ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलीये.
संग्रहित लेख, दिनांक 30th May 2013 रोजी प्रकाशित
अंकित चव्हाणला अंतरिम जामीन
स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या राजस्थान रॉयल्सचा क्रिकेटपटू अंकित चव्हाण याला दिल्लीतील सत्र न्यायालयाने गुरुवारी अंतरिम जामीन मंजूर केला.
First published on: 30-05-2013 at 03:31 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spot fixing delhi session court approve bail to ankeet chavan