श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर इथल्या सुरक्षा रक्षकांनी देशाच्या पूर्व भागातील इस्लामिक स्टेटशी (आयएस) संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली, यावेळी झालेल्या चकमकीत १५ दहशतवादी ठार झाले आहेत.
AFP quoting Sri Lanka Police: 15 killed in raid on Islamist hideout
— ANI (@ANI) April 27, 2019
श्रीलंकेच्या लष्कराचे प्रवक्ते सुमित अटापटू यांनी शनिवारी सांगितले की, सुरक्षा रक्षकांनी जेव्हा कलमुनई शहरात बंदुकधाऱ्यांच्या ठिकाण्यांवर घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिथे लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला, त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. यामध्ये इस्लामिक स्टेटचे १५ दहशतवादी ठार झाले. या चकमकीत एक स्थानिक नागरिकालाही आपला जीव गमवावा लागला आहे.