पीटीआय, लंडन
भारतीय वंशाच्या शिक्षिका आणि राजकारणी श्रीला फ्लेथर यांचे मंगळवारी ब्रिटनमध्ये निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या.एक शिक्षिका, राजकारणी असण्या व्यतिरिक्त, श्रीला हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये त्यांच्या सुंदर साडय़ांसाठी ओळखल्या जात होत्य. फ्लेथर या बर्कशायरमध्ये विंडसर व मेडेनहेडचे प्रतिनिधित्व केले होते.
मेमोरियल गेट्स कौन्सिलचे आजीवन अध्यक्ष म्हणून, लंडनच्या हाइड पार्क कॉर्नर येथे आयकॉनिक मेमोरियल गेट्सच्या बांधकामात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. पहिल्या महायुद्धात बलिदान दिलेल्या सुमारे ५० लाख राष्ट्रकुल सैनिकांना श्रद्धांजली म्हणून आयकॉनिक मेमोरियल गेट्सची निर्मिती करण्यात आली आहे.