नवी दिल्ली : द्रमुकचे सर्वेसर्वा व तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलीन यांच्या मध्यस्थीने मारन बंधूंमधील वाद मिटवण्यात आला. त्यासाठी द्रविडर कझागमचे अध्यक्ष के. वीरमणी व द हिंदू दैनिकाचे एन. राम यांनी मदत केली.

करारानुसार द्रमुकचे खासदार दयानिधी मारन यांना रोख ८०० कोटी रुपये मिळतील तसेच चेन्नईतील उच्रभ्रू अशा बोट क्लब परिसरात एक एकर जागा मिळेल. त्याचे मूल्य १०० कोटी इतके असल्याचे मारन कुटुंबीय व द्रमुकच्या उच्चपदस्थ सूत्रांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दयानिधी यांनी जूनमध्ये बंधू कलानिधी कायदेशीर नोटीस पाठवली होती. यातून वाद चिघळला होता. ‘सन टीव्ही’मध्ये एकतर्फी निर्णय तसेच समभाग वितरणात भ्रष्टाचाराचा आरोप त्यांनी केला होता. दयानिधी यांनी तडजोड काढण्यासाठी दीड हजार कोटींची मागणी केली होती. तर कलानिधी हे ५०० कोटी देण्यास तयार होते. स्टॅलिन यांनी यात सुरुवातील तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश येत नसल्याने त्यांनी वीरमणी व एन. राम यांची मदत घेतली. या दोघांचे मारन कुटुंबाशी सौहार्दाचे संबंध आहेत.