चीनची महिला टेनिस स्टार पेंग शुआईने तिच्याच देशातील एका मोठ्या नेत्यावर लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप केला आहे. पेंग शुआई ही माजी विम्बल्डन आणि फ्रेंच ओपन दुहेरी विजेता आहे. ३५ वर्षीय पेंगने सोशल मीडिया पोस्टद्वारे निवृत्त व्हाईस प्रीमियर झांग गाओली यांच्यावर बळजबरीने लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा जाहीरपणे आरोप केला आहे. नंतर तीने की पोस्ट डिलीट केली. मंगळवारी रात्री उशिरा तिच्या अधिकृत Weibo खात्याच्या स्क्रीनशॉटद्वारे याची पुष्टी झाली आहे. हा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे.
झांग यांनी २०१३ ते २०१८ दरम्यान चीनचे उप-प्रीमियर म्हणून काम केले आणि ते चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचे जवळचे मित्र होते. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार झांग यांच्यावर केलेल्या आरोपाच्या पोस्टमध्य पेंग म्हणाली, “टेनिस खेळण्यासाठी त्या घरी गेल्यानंतर त्याने पहिल्यांदा तिच्यावर जबरदस्ती केली. त्या दुपारी तीने संमती दिली नाही आणि ती रडणे थांबवू शकले नाही.” तिने लिहिले की, “त्याने मला घरी नेऊन त्याच्याशी बळजबरीने संबंध ठेवायला भाग पाडले.”
पेंगने सांगितले की ती केलेल्या आरोपांचा पुरावा देऊ शकणार नाही. ती म्हणाली, “माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत, आणि कोणताही पुरावा शोधणे अशक्य आहे… तुला (झांग) नेहमी भीती वाटत होती की मी टेप रेकॉर्डरसारखे काहीतरी घेऊन येईल, पुरावे रेकॉर्ड करण्यासाठी किंवा काहीतरी… माझ्याकडे कोणतेही ऑडिओ रेकॉर्ड नाहीत, व्हिडिओ रेकॉर्ड नाही, फक्त माझा विकृत पण अगदी खरा अनुभव.”