राजधानीला मंगळवारी पहाटे भूकंपाचे चार सौम्य धक्के बसले. मात्र या धक्क्य़ांमुळे कोणतीही हानी झाली नाही. मध्यरात्री १२.४१ ते पहाटे ३.४० या तीन तासांच्या कालावधीत भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू दक्षिण दिल्लीजवळ होता. भूकंपाचा पहिला धक्का मध्यरात्री १२.४१ मिनिटांनी जाणवला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ३.१ एवढी नोंदविण्यात आली. नंतर ३.३, २.५ व २.८ रिश्टर स्केल क्षमतेचे धक्के बसले. भूकंपाचा केंद्रबिंदू  भूगर्भाखाली केवळ १० ते ११ किलोमीटर अंतरावर असल्याने लोकांना त्याची तीव्रता जाणवली. भूकंप जाणवल्यानंतर अनेक लोकांनी आपापल्या घराबाहेर धाव घेतली.