एक्स्प्रेस वृत्त : नवी दिल्ली : ‘विद्यार्थ्यांची निवड आणि आंतरविद्याशाखीय अभ्यास’ यावर लक्ष केंद्रित करून आयआयटी, मुंबईने संपूर्ण नवा आणि अभिनव प्रकारचा ‘दि लिबरल आर्टस-सायन्स -इंजिनियिरग’ (एलएएसई) हा पदवीपूर्व अभ्यासक्रम दोन वर्षांपूर्वी जाहीर केला होता. मात्र तो अद्याप सुरू होऊ शकलेला नाही.

‘एलएएसई’ या अभ्यासक्रमासाठी ३० जागा ठेवण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना अनुकूल असलेल्या विषयांमध्ये त्यांना ‘बॅचलर ऑफ सायन्स’ किंवा ‘बीएस’ पदवी मिळवण्याची संधी या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्यात आली होती. हा भारतातला पहिलाच एक मुक्त शिक्षण शैलीचा एसटीईएम-स्टेम (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअिरग आणि मॅथ) प्रकार होता. मात्र दोन वर्षांनंतरही तो अद्याप मार्गी लागू शकलेला नाही. या अभ्यासक्रमासाठी एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, परंतु अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले किमान १० विद्यार्थीही मिळाले नाहीत.

telangana suicides
तेलंगणात ११वी आणि १२वीचा निकाल जाहीर होताच काही तासांतच सात विद्यार्थ्यांची आत्महत्या
Dissatisfaction among students over delay in Maharashtra Public Service Commission exams results interviews
‘एमपीएससी’च्या परीक्षा, निकालांची प्रतीक्षाच; अनेक परीक्षांचे अभ्यासक्रम प्रलंबित, विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी

‘आयआयटी’चे विद्यार्थी त्यांच्या चार वर्षांच्या अभियांत्रिकीच्या अभ्यासाबरोबरच वेगवेगळय़ा विभागांच्या अभ्यासक्रमांचाही अभ्यास करतात. त्यात ‘मानवता आणि समाज विज्ञान’ यांसारख्या विषयांचाही समावेश असतो. तथापि, या अभ्यासक्रमांची संख्या त्यांच्या मुख्य शाखेच्या अभ्यासक्रमाच्या आवश्यकतांनुसार मर्यादित असते. याउलट, ‘एलएएसई’ अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध विभागांचे बहुविध अभ्यासक्रम निवडण्याची संधी मिळते. विद्यार्थ्यांनी ‘एलएएसई’ला प्रवेश घेतला की दुसऱ्या वर्षी त्यांना दक्षिण आशियाचा इतिहास, विज्ञानाचा इतिहास, विषमता आणि समाज यांसारखे विषयही अभ्यासता येतात.

कारण काय?

‘आयआयटी’च्या ‘बी. टेक’ पदवीबाबत विद्यार्थी जेवढे आश्वासक असतात तेवढे या अभ्यासक्रमाच्या पदवीबाबत नसतात. त्यांनी या नव्या अभ्यासक्रमात रस न दाखवण्यामागे तो स्वीकारण्याची त्यांची मानसिक तयारी नसणे आणि पदवी मिळण्याबाबत त्यांच्या मनात असलेली साशंकता ही कारणे असल्याचे काही प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे मत आहे.