अफगाणिस्तानात परदेशी ताफ्यावर आत्मघाती हल्ला करण्यात आला असून यामध्ये ११ मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. कंदहार येथे हा हल्ला झाला आहे. अफगाणिस्तानात परदेशी लष्कर ताफ्यावर आत्मघाती हल्ला करण्यात आला असून यामध्ये ११ मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. कंदहार येथे हा हल्ला झाला आहे. स्फोट झाला तेव्हा ही मुलं जवळच उभी होती. एका कारमध्ये हा शक्तिशाली स्फोट झाला. या स्फोटात जवळपास १६ जण जखमी झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याआधी अफगाणिस्तानची राजधानी काबूल शहर सोमवारी सकाळी सलग दोन स्फोटांनी हादरले. या स्फोटात २५ जण ठार तर ४५ हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. पहिला स्फोट शशदारक परिसरात झाला. त्यानंतर दुसरा स्फोट हा त्याच परिसरातील एनडीएस गुप्तचर कार्यालयाजवळ झाला. या स्फोटात एएफपी या वृत्तसंस्थेचे छायाचित्रकार मराई शाह हे ठार झाले आहेत.

टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, दुसऱ्या स्फोटात अनेक पत्रकार जखमी झाल्याचे वृत्त आहे. हे सर्व पत्रकार स्फोटाचे वार्तांकन करण्यासाठी घटनास्थळी उपस्थित होते. सध्यातरी कोणत्याही दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. काबूल पोलिसांचे प्रवक्ते दाऊद अमीन यांनी एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, हल्ल्यात मारले गेलेले आणि जखमी झालेले सर्वसामान्य नागरिक आहेत. गृह मंत्रालयाचे प्रवक्ते नजीब दानिश यांनी हल्ल्याला दुजोरा दिला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suicide attack on foreign convoy killed 11 children in afghanistan
First published on: 30-04-2018 at 15:45 IST