२०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना, भाजपाला अभूतपूर्व यश मिळालं. यानंतर मोदींचं कौतुक देशभरातून होतं आहे. त्याच कौतुकाचा भाग म्हणून सुरतमधल्या एका आईसक्रिम वाल्याने मोदींचा चेहरा असलेले आईसक्रिम तयार केले आहे. हे आईसक्रिम सध्या चांगलेच चर्चेत आहे. ‘मोदी सीताफळ कुल्फी’ या नावाने हे आईसक्रिम मिळते आहे. विवेक अजमेरा या आईसक्रिम पार्लर मालकाने भाजपाच्या विजयाचं अनोखं सेलिब्रेशन केलेलं पहायला मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याचा आकार असलेलं हे आईसक्रिम सध्या गुजरातमध्ये चर्चेचा विषय ठरलं आहे. अनेक ग्राहक ही कुल्फी विकत घेतात आणि त्यासोबत सेल्फीही काढतात असंही अजमेरा यांनी सांगितलं

पहा व्हिडिओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आईसक्रिमवर असलेली इमेज ही कोणत्याही मशीनद्वारे किंवा संगणकाद्वारे न बनवता हाताने तयार करण्यात आली आहे. हे आईसक्रिमसारखी २०० आईसक्रिम तयार करण्यासाठी आईसक्रिम पार्लरमध्ये काम करणाऱ्यांना २४ तासांचा अवधी लागला असे एएनआयने म्हटले आहे. हे खास आईसक्रिम ३० मे पर्यंत मिळू शकणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील तेव्हापासून हे आईसक्रिम मिळणं बंद होणार आहे.

विजयाच्या दिवसापासून मोदी सीताफळ कुल्फी शहरात चांगली विकली जाते आहे. या कुल्फीला चांगला प्रतिसाद गुजरात भागातून मिळतो आहे असंही अजमेरा यांनी म्हटलं आहे. निकालाच्या दिवशी ३०३ जागा जिंकून भाजपाने विरोधकांना पराभवाची धूळ चारली. त्यानंतर मोदींचे सर्वतत्र कौतुक होते. आता याच कौतुकाचा एक भाग म्हणून या आईसक्रिम चाल