अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारीच्या दिवशी राम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळ्याला साधू संतांची आणि अनेक क्षेत्रातल्या मान्यवरांची उपस्थिती होती. २२ जानेवारी २०२४ या दिवशी मंदिरात प्राणप्रतिष्ठा करु नये हा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढे ढकलावा असा सल्ला शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी दिला होता. तसंच त्यांनी राम मंदिराचं काम अपूर्ण असताना होत असललेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर टीकाही केली होती. स्वामी गोविंद देव गिरी यांनी मात्र अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे शंकराचार्यच नाहीत असा दावा केला आहे.

काय म्हटलं आहे गोविंद देव गिरी महाराजांनी?

“भगवान रामरायाचं विस्थापन होऊन शेकडो वर्षे झाली होती. तंबूमध्ये रामराया राहिले. त्यामुळे भक्तिभावाच्या दृष्टीने आम्ही मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्याची घाई केली. मंदिराचं संपूर्ण बांधकाम व्हायला काही वर्षे जातील. पण काही विलंब न करता आपण रामरायाला त्याच्या स्थानी मोठ्या दिमाखाने आणि सन्मानाने विराजमान केलं. संक्रांतीच्या आधी प्राणप्रतिष्ठा होत नाही. त्यामुळे संक्रांत आणि २५ जानेवारी यामधला दिवस आम्ही निवडला. कारण २५ जानेवारीनंतर अयोध्येतली मंडळी प्रयाग या ठिकाणी अनुष्ठानाला जातात. त्याला कल्पवास असं म्हणतात. त्यामुळे आम्ही २२ जानेवारी ही तारीख निवडली. अयोध्येहून साधूसंत प्रयागला जाण्याआधी आम्हाला मुहूर्त साधायचा होता. त्यामुळे देशभरातल्या सर्वोत्तम ज्योतिषांकडून आम्ही २२ जानेवारी तारीख काढली होती. त्यादिवशी प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त ठरवण्यात आला. “

Baba Ramdev and Acharya Balkrishna in Supreme Court Unreservedly and unconditionally apologized
रामदेव, बाळकृष्ण यांच्याकडून बिनशर्त माफी
sanjay mandlik
राजे-मंडलिक गट यापुढेही समन्वयाने काम करेल – खासदार संजय मंडलिक
mla ruturaj patil praise shahu chhatrapati work
संकटकाळात शाहू छत्रपतींनी जिल्ह्याचे पालकत्व निभावले- आमदार ऋतुराज पाटील
Shahu Maharaj
शाहू महाराजांनी घेतली काडसिद्धेश्वर स्वामींची भेट; स्वामीनी दिल्या विजयाच्या शुभेच्छा

हे पण वाचा- “होय आम्ही प्रभू रामाचे वंशज..”, ‘हा’ पुरावा दाखवत राजस्थानच्या राज घराण्याचे पद्मनाभ सिंह यांचा दावा

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात शंकराचार्यांचा सहभाग नव्हता हे चुकीचं

“प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात शंकराचार्यांचा सहभाग नव्हता हे म्हणणं चुकीचं आहे. शंकराचार्यांच्या नावावर काही काल्पनिक गोष्टीही पसरवल्या जातात. आचार्य पीठांच्या लक्षात हे आलं की अपप्रचार होतो आहे तेव्हा श्रृंगेरी पिठाने स्वतः पत्रक प्रकाशित केलं. शारदा पीठाने पत्र प्रकाशित केलं. ज्योती पीठाचे शंकराचार्य आमचे न्यासी आहेत. जगन्नाथ पुरीचे जे शंकराचार्य आहेत त्यांचे काही प्रामाणिक मतभेद होते. स्वामी निश्चलानंद महाराजांबाबत आम्हाला आदर आहे. तेदेखील गैरसमजातून बोलत होते. त्यांच्याविषयी कुठलाही आकस नाही. मी त्यांना भेटलो की त्यांच्या शंकांचं निरसन होईल हे मला ठाऊक आहे. या सगळ्या शंकराचार्यांपेक्षा कांची कामकोटी पीठाचे विजयेंद्र सरस्वती महाराज स्वतः २१ जानेवारी रोजी आले होते. हा सगळा कार्यक्रम ठरवताना आचार्य कोण असावे? कसा कार्यक्रम असेल हे त्यांच्यासह बसून ठरवलं होतं. २१ जानेवारीला त्यांनी न्यासाधिक विधी सगळे कांचीच्या शंकराचार्यांनी पूर्ण केलं. ३ तास त्यांनी समाधानाने विधी केले. कांची पीठाच्या शंकराचार्यांचं स्थान हे सर्वात मोठं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आदि शंकराचार्यांनी शिष्यांसाठी चार पिठं निर्माण केली. मात्र शंकराचार्य स्वतः कांची कामकोठीला राहिले. त्यामुळे चारही पिठांच्या ती शिष्य पीठं आहेत. मूळ पीठ हे कांची पीठ आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे” असं गोविंद देव गिरी महाराज यांनी म्हटलं आहे. माझा कट्टा या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं.

अविमुक्तेश्वरानंद हे शंकराचार्यच नाहीत

एकमात्र व्यक्ती पुन्हा पुन्हा या गोष्टीबाबत म्हणजेच राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत बोलत होती. ती व्यक्ती म्हणजे काशीमध्ये बसलेले एक संन्यासी अविमुक्तेश्वरानंद. ते शंकराचार्य म्हणून बोलत होते. मात्र हे लक्षात घ्या की अविमुक्तेश्वरानंद हे शंकराचार्य नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने शंकराचार्य हे बिरुद लावण्याची बंदी त्यांच्यावर घातली आहे. पण हा संन्यासी पुन्हा पुन्हा असं म्हणतो आणि प्रसार माध्यमं त्या गोष्टी समोर आणतात. यात चूक त्या संन्यासी माणसाची आहे की प्रसार माध्यमांची आहे? याचा विचार लोकांनी केला पाहिजे. आचार्य पीठांचा यात कुठलाही आक्षेप नव्हता. असंही गोविंद देव गिरी महाराज यांनी सांगितलं.