संयुक्त राष्ट्र संघामध्ये लहान मुलांच्या शिक्षणासाठी अत्यंत पोटतिडकीने आवाहन करणाऱ्या मलाला युसुफझई या किशोरवयीन शैक्षणिक कार्यकर्तीने पाकिस्तानात परतावे आणि मदरशामध्ये दाखल व्हावे, अशी सूचना तालिबान्यांनी केली आहे. गतवर्षी शैक्षणिक कार्य केल्यामुळेच अतिरेक्यांकडून प्राणघातक हल्ला झालेल्या मलाला हिला अदनान रशिद या तालिबानी अतिरेक्याने पत्र लिहिले आहे. अदनान हा पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यावरील हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार होता. आपल्या पत्रात त्याने मलाला हिला सांगितले आहे की, तिने पाकिस्तानात परतून महिलांसाठी असलेल्या मदरशांमध्ये शिक्षण घ्यावे आणि इस्लामी संस्कृतीचा स्वीकार करीत आपली लेखणी आणि ज्ञान धर्मासाठी वापरावे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jul 2013 रोजी प्रकाशित
मलालाने परत यावे – तालिबान्यांचे आवाहन
संयुक्त राष्ट्र संघामध्ये लहान मुलांच्या शिक्षणासाठी अत्यंत पोटतिडकीने आवाहन करणाऱ्या मलाला युसुफझई या किशोरवयीन शैक्षणिक कार्यकर्तीने पाकिस्तानात परतावे आणि मदरशामध्ये दाखल व्हावे, अशी सूचना तालिबान्यांनी केली आहे.
First published on: 18-07-2013 at 01:11 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taliban militant urges malala to come back