आपल्या आजारी आईला भेटण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती तेहेलकाचे संस्थापक संपादक तरुण तेजपाल यांनी गुरुवारी न्यायालयाला केली.
तेजपाल यांच्या आई उत्तर गोवा येथे राहत आहेत. अतिरिक्त सत्र न्यायालयात तेजपाल यांनी अर्ज दिला असून आपल्या आईची प्रकृती ठीक नसून त्यांना मेंदूचा कर्करोग झाला आहे. त्यांची तब्बेत खालावत असून त्यांना भेटण्याची परवागनी द्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. तेजपाल यांनी उत्तर गोवा येथील मोइरा गावात घर घेतले आहे. त्यांच्या आईला रुग्णालयातून सोडल्यानंतर त्या याच घरात राहत आहेत. तेजपाल यांनी आपल्या आईला भेटण्यासाठी दुसऱ्यांदा अर्ज केला आहे. यापूर्वी १३ मार्चला न्यायालयाने तेजपाल यांना आपल्या आईला भेटण्यासाठी परवानगी दिली होती. बलात्काराच्या प्रकरणात तेजपाल सध्या शिक्षा भोगत आहेत.