टाटा मोटर्स कंपनीच्या एका अधिकाऱ्याची निलदिह येथे अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. टेल्को पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. सहायक महाव्यवस्थापक ब्रजेश सहाय यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. ते मोटारीने घरी जात असताना निलदिह येथील त्यांच्या निवासस्थानाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळय़ा झाडल्या. त्यात ते जागीच ठार झाले असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अमोल व्ही. होमकर यांनी सांगितले. त्यांच्या शरीरात सात ते आठ गोळय़ा लागल्या आहेत. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी शोधकार्य सुरू केले आहे.