उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका खासगी शाळेतील शिक्षकाने दोनचा पाढा विसरल्यानं विद्यार्थिनीच्या हातावर चक्क ड्रील मशीन चालवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित विद्यार्थिनी कानपूर जिल्ह्यातील सिसमौ भागातील रहिवासी आहे. प्रेमनगरमधील उच्च प्राथमिक शाळेत पाचव्या इयत्तेत शिकणाऱ्या या विद्यार्थिनी सोबत हा क्रूर प्रकार घडला आहे.

पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, या घटनेची माहिती मिळताच पीडित विद्यार्थिनीचे नातेवाईक शाळेत पोहोचले. यावेळी शाळेच्या परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. “शिक्षकाने मला दोनचा पाढा विचारला. हा पाढा मला सांगता न आल्याने त्यांनी माझ्या हातावर ड्रील मशीन चालवली. तेव्ही शेजारी उभ्या असलेल्या एका सहकारी विद्यार्थ्याने ताबडतोब या मशीनचा प्लग काढला”, अशी तक्रार विद्यार्थिनीने पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या विद्यार्थिनीच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे.

UP Murder: ड्रग्जच्या आहारी गेलेल्या पत्नीचा निर्घृण खून; मृतदेहाचे केले तुकडे, उत्तर प्रदेशच्या सीतापूरमधील थरारक घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरवातीला शाळेतील शिक्षकांनी स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांना या घटनेबाबत माहिती दिली नव्हती. मात्र, पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी शाळेत घातलेल्या गोंधळानंतर शिक्षणाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे. “या घटनेचा तपास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रेमनगर आणि शास्त्री नगरचे ब्लॉक शिक्षण अधिकारी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल पाठवतील. दोषीवर दंडात्मक कारवाई केली जाईल”, अशी माहिती कानपूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सुजीत कुमार सिंह यांनी दिली आहे.