काळी जादू केल्याच्या संशयावरून एका जोडप्याला झाडावर टांगल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. श्यामाम्मा आणि यादाह असं या दाम्प्त्याचं नाव असून तेलंगणातील सँगरेड्डी जिल्ह्यातील कोलकूर गावात हा प्रकार घडला आहे.

या दाम्पत्याकडून घरात काळी जादू केली जात होती, असा ग्रामस्थांना संशय होता. या काळ्या जादूमुळे गावाला धोका होता. या संशयातून गावकऱ्यांनी या दाम्प्त्याला झाडाला टांगलं. झाडाला टांगल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना बेदम मारहाणही केली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

याप्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या दाम्पत्याला झाडावरून काढलं. यामुळे दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी ग्रामस्थांविरोधात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.