भाजपा प्रवक्त्यांनी प्रेषित मोहम्मदांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आखाती देशांकडून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. या अवमान प्रकरणी तेलंगणाचे मंत्री के. टी. रामराव (KTR) यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपाकडून देण्यात आलेल्या द्वेषपूर्ण वक्तव्यांसाठी भारताने का माफी मागायची असा थेट सवाल केटीआर यांनी केला आहे. त्यांनी याबाबत ट्वीट करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

के. टी. रामराव आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी भाजपाने केलेल्या द्वेषपूर्ण धर्मांध वक्तव्यांसाठी भारताने देश म्हणून आंतरराष्ट्रीय समुहाची माफी का मागायची? यासाठी भारताने देश म्हणून माफी मागू नये, तर भाजपाने माफी मागावी. तुमच्या पक्षाने दिवसरात्र द्वेष पसरवल्याबद्दल भारतीयांची माफी मागितली पाहिजे.”

“भाजपा खासदार प्रज्ञा यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येचं समर्थन केलं. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मौन धक्कादायक होतं. मला तुम्हाला आठवण करू द्यायची आहे की तुम्ही ज्या चुकीच्या गोष्टीला होऊ देता त्याला तुम्ही मान्यता देत असता. वरिष्ठ नेतृत्वाकडून या द्वेषाला मिळणारं समर्थन मोठं नुकसान करेल,” असंही त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा : कचराकुंडीवरील मोदींचे फोटो लावण्याला जितेंद्र आव्हाडांचा विरोध, निषेध करत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“भाजपाच्या चुकीची माफी भारत मागणार नाही, काँग्रेसचा हल्लाबोल”

काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी देखील मोदी सरकारच्या भूमिकेवरून टीकास्त्र सोडलं. चूक भाजपाने करायची आणि माफी भारताने का मागायची? असा प्रश्न त्यांनी विचारला.