दक्षिण काश्मीरमधील पुलवामाच्या त्राल बसस्थानकावर आज(शनिवार) दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार सात जण जखमी झाले आहेत. या जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपाचार सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राप्त माहितीनुसार, दहशतवाद्यांनी त्राल येथील बसस्थानकावरील एसएसबी जवानांवर हा ग्रेनेड हल्ला केला. मात्र, त्यांचा निशाणा चुकला आणि रस्त्यावरच ग्रेनेडचा स्फोट झाला. ज्यामध्ये सात नागरिक जखमी झाले.

हल्ल्यानंतर तातडीने संपूर्ण परिसर सील करण्यात आला व दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली, असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे. तर, जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या अगोदर श्रीनगरमधील लावापोरा भागात दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत, तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terrorists hurled a grenade on security forces at tral bus stand in pulwama district msr
First published on: 02-01-2021 at 13:10 IST