आयुष्यात प्रत्येकालाच पर्यायांपैकी एक निवडण्याची संधी मिळते. आपण निवडलेला पर्याय आपल्या जीवनाची जीवनाची दिशा ठरवत असतो. आयुष्यातील हेच निर्णय माणसाला महापुरूष बनवतात. असेच एक महापुरुष अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या आयुष्यात घेतलेल्या सर्वात मोठ्या निर्णय म्हणजे भारतामध्ये क्रांती होय. . वाजपेयी यांच्या या निर्णयामुळे त्यांचीच नव्हे, तर देशाची दिशा ठरवली.

आज आपण प्रत्येकजण तासंतास स्मार्टफोनवर बोलतो किंवा वापरतो ते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यामुळेच. गुरूवारी त्यांनी दिल्लीतील एम्स रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वाजपेयी यांच्या धाडसी निर्णयामुळेच आज किमान निम्मे भारतीय  मोबाइलधारक आहेत.

१९९५मध्ये नरसिंह राव सरकारने भारतातमध्ये मोबाईल फोन आणला होता. भारतामध्ये पहिला फोन १९९५ ला केला गेला होता. हा कॉल प. बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी कोलकाता येथून तत्कालीन केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम यांना केला होता. कोलकात्याच्या रॉयटर बिल्डींग मधून दिल्लीच्या संचारभवनात हा कॉल कनेक्ट केला गेला होता. नेट सर्विसच्या माध्यमातून हा कॉल केला गेला होता. पण त्यावेळच्या सरकारच्या टिलेकॉमच्या धोरणामुळे स्मार्टफोन कंपन्यांनी करार रद्द केला.

त्यानंतर १९९९ मध्ये वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी दुरसंचारचा हा कारभार प्रमोद महाजन यांच्याकडे सोपवला. आणि तेव्हापासूनच भारतामध्ये टेलिकॉम क्रांतीला सुरावात झाली. प्रमोद महाजन यांनी टेलिकॉम सेक्टरला नव्याने भारतामध्ये आणले. त्यासाठी प्रमोद महाजन यांनी वाजपेयीसोबत मिळून नव्या पॉलिसी आखल्या. त्यावेळी अनेक खाजगी कंपन्यां भारतामध्ये रूजल्या. तेव्हापासून भारतामध्ये टेलिकॉम क्रांतीच्या नव्या अध्यायाला सुरूवात झाली होती.

वाजपेयी सरकारने त्यावेळी दूरसंचार धोरणांमध्ये बदल करून संचार क्रांती आणली. त्यांच्या सरकारने टेलीकॉम कंपन्यांना असलेली फिक्स्ड लायसेन्स फी रद्द केली. तसेच त्या ठिकाणी रेव्हेन्यू शेअरिंग यंत्रणा अंमलात आणली. अटल सरकारमध्येच 15 सप्टेंबर 2000 रोजी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ची स्थापना झाली. सोबतच टेलीकॉम सेक्टरमध्ये होणारे वाद सोडवण्यासाठी 29 मे 2000 रोजी टेलीकॉम डिस्प्यूट सेटलमेंट अपीलेट ट्रिब्यूनल (TDSAT) ची स्थापना केली.