पीटीआय

मुलांमधील सांस्कृतिक मूल्ये लोप पावत असल्याने ते थांबविण्यासाठी कर्नाटकमधील शाळांत भगवद्गीतेचे पाठ शिकविण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. शालेय अभ्यासक्रमात नीतिशास्त्र शिकविले जावे, अशी अनेक नागरिकांची मागणी आहे, असे राज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी सांगितले.  

apmc market, license issue, nashik district
नाशिक : बाजार समित्यांमध्ये उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Simran Thorat first woman merchant navy officer
शिक्षणासाठी पालकांनी जमीन विकली, पुण्याच्या सिमरन थोरातने मर्चंट नेव्ही क्षेत्रात मिळला ‘हा’ बहुमान
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी

 विशेष म्हणजे गुजरात सरकारही शाळांमध्ये भगवद्गीता शिकविण्याचे नियोजन करीत आहे. त्यानंतर आता कर्नाटकच्या शिक्षणमंत्र्यांनी शुक्रवारी तसे सूतावाच केले. पण तसे करण्याआधी शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नागेश यांनी पत्रकारांना सांगितले की, गुजरात सरकारने अभ्यासक्रमात नीतिशास्त्र अंतर्भूत करण्याचा निर्णय घेतला असून ते तीन ते चार टप्प्यांत केले जाईल. त्यानुसार पहिल्या टप्प्यात भगवद्गीता अंतर्भूत केली जाईल, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. कर्नाटकमधील शाळांत नीतिशास्त्र शिकवायचे की नाही, याचा निर्णय मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी चर्चा केल्यानंतर घेतला जाईल, असा निर्वाळा त्यांनी दिला.

शाळांमध्ये यापूर्वी नीतिशास्त्राची एक तासिका घेतली जायची. ती प्रत्येक आठवडय़ात असायची. त्यात रामायण, महाभारत यांच्यातील कथांवर आधारित धडे दिले जायचे. कर्नाटकमध्ये असे काही करण्यापूर्वी शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा केली जाईल.

– बी. सी. नागेश, कर्नाटकचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री