संसदेच्या पावसाळी अधिवेशनची तारीख जाहीर झाली आहे. १८ जुलैला संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असून १३ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन सुरु राहणार आहे. लोकसभा सचिवालायाने प्रसिद्धीपत्रक जारी करत अधिवेशनाची तारीख जाहीर केली आहे. या अधिवेशनात विरोधी पक्ष कोणकोणत्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अधिवेशनात अग्निपथ योजनेवरून हंगामा होण्याची शक्यता
देशात दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ सारखे अनेक प्रश्न अधिवेशनात मांडले जाऊ शकतात. तसेच देशभरातून विरोध केल्या जाणाऱ्या अग्निपथ योजनेवरूनही विरोधी पक्ष केंद्र सरकारला घेरण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीचे पावसाळी अधिवेशनही विविध विषयांनी चांगलेच गाजले होते. शेतकरी आंदोलन, इंधन दरवाढ विषयांवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षाने सरकारकडे परवानगी मागितली होती. मात्र, केंद्र सरकारने ती परवानगी नाकारली त्यामुळे विरोधी पक्षांनी अधिवेशनात गदारोळ घातला होता.

अग्निपथ भरती योजना; सरकारचा दावा अन् आक्षेप, व्हिडीओ –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रपती पदाची निवडणूक<br>लोकसभा सचिवालायाने जाहीर केलेल्या पत्रकानुसार अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार आहे. २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. तर २५ जुलै रोजी देशाचे नवेनिर्वाचित राष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. राष्ट्रपती निवडणुकीनंतर ६ ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडणार आहे. ११ ऑगस्टला उपराष्ट्रपती शपथ घेऊन कारभार हाती घेणार आहेत.